Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Mumbai Siddhivinayak Temple On Eknath Shinde : मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांतील रोख देणग्या, दागिने आणि मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या पाच वर्षांत जमा झालेल्या रोख देणग्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे मंदिराच्या आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी होणार असून, देणग्यांची नोंद, दागिन्यांचा हिशोब आणि त्यांच्या व्यवस्थापनाची तपासणी केली जाणार आहे.मंगळवारी मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास २० मिनिटे झालेल्या चर्चेनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना विशेष लेखापरीक्षणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असून, कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती आहे. या चौकशीमुळे कथित देणगी घोटाळ्याबाबतचे आरोप कितपत तथ्याधारित आहेत, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com