दिवाळीच्या तोंडावर ST कर्मचाऱ्यांचा संपाचा एल्गार; गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली

MSRTC Employees Call Strike : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि महागाई भत्ता वाढवण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सेवा शक्ती राष्ट्रीय कर्मचारी महासंघ एसटी कर्मचारी संघटने एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करावे, महागाई भत्त्यामध्ये वाढ करावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे.

दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटीला प्रवाशांची मोठी गर्दी असते. गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढलेली असताना कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. दरम्यान, पंढरपूर आगारातील कर्मचाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 6 ऑक्टोबरपासून आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.