Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी ताटकळले

Mumbai-Pune Expressway Traffic: पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. बाणेर-म्हाळुंगेजवळ ही वाहतूक कोंडी झाली असून ज्यामुळे हजारो प्रवासी अडकले आहेत.
Mumbai-Pune Expressway Traffic:
MASSIVE TRAFFIC JAM ON MUMBAI-PUNE EXPRESSWAY AFTER HEAVY RAINFALLsaam tv
Published On

पुणे आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगे परिसराजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहनांचा वेग कमालीचा मंदावला होता, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक गेल्या अनेक तासांपासून वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. गर्दीच्या वेळेत झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात जाणारे कर्मचारी, हिंजवडी आणि परिसरातील आयटी (IT) व्यावसायिक तसेच नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या नागरिकांना तासनतास एकाच ठिकाणी उभे राहावे लागल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com