मराठवाड्यात 500 च्या नोटांचा तुटवडा; तुळजापूरमध्ये व्यापाऱ्यांना फटका

Marathwada Faces Currency Crisis: संपूर्ण मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. तुळजापूरमध्ये व्यापारी आणि भाविकांना व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत.
Summary
  • मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.

  • तुळजापूरमध्ये व्यापारी आणि भाविकांना मोठा फटका बसत आहे.

  • बँकांकडून फक्त 100 रुपयांच्या नोटांचे वितरण केलं जातंय.

धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये बँकांमध्ये 500 च्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्याचा फटका तुळजापूरमध्ये व्यापाऱ्यांना बसला आहे. लग्नसराईचा काळ उन्हाळी सुट्ट्या असल्याने तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी होतेय. मात्र व्यवहारिक देवाणघेवाण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. संभाजीनगर, जालना आणि नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राहकांना केवळ 100 रुपयांच्या नोटा घेण्याचा आग्रह धरला जातोय. नोटा हव्या असतील तर फक्त शंभरच्या घ्या, अन्यथा रोख रक्कम मिळणार नाही, असं मराठवाड्यातील बहुतांश बँकांमधून सांगितले जातंय. बाजारपेठेत चलनाची चणचण निर्माण झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com