VIDEO: बीडमध्ये दाखल होताच Manoj Jarange Patil यांची धनगर समाजाच्या उपोषणाला भेट

Manoj Jarange Patil News: बीडमध्ये मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता रॅली, बीडमध्ये दाखल होताच जरांगेंची धनगर समाजाच्या उपोषणाला भेट.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये जनजागृती शांतता रॅली आयोजीत करण्यात आली आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांनी रॅलीला हजेरी लावली. बीडमध्ये दाखल होताच, जरांगे यांनी धनगर समाजाच्या उपोषणाला भेट दिली आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून आकाश निर्मळ यांचं आमरण उपोषण सुरु आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती रॅली आहे, या रॅलीत सहभागी होण्यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाई आकाश निर्मळ यांची भेट घेत विचारपूस केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com