VIDEO: जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले?

Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे. अनेक इच्छूक उमेदवारांनी जरांगे पाटलांची भेट देखील घेतली आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपवून आता मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. विधानसभावार इच्छूक उमेदवारांनी जरांगेची भेट घेतली. यावर बोलताना जरांगे पाटलांनी उमेदवार सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणार असला पाहिजे.राजकारण आणि आंदोलन हा वेगवेगळा भाग आहे. अस यावेळी वक्तव्य केल. राजकारणात जातीचा प्रश्न नसतो आंदोलनात ठीक आहे.सगळ्यांना धरून चालणारे उमेदवार असणं गरजेचं आहे,अस देखील जरागे पाटील म्हणाले. २९ ऑगस्ट रोजी याबाबत बैठक बोलावली असल्याची त्यांनी माहिती दिली. सोबतचं निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com