Manikrao Kokate: कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आणि मला हे खातंं दिलं आहे; माणिकराव कोकाटेंच पुन्हा वादग्रस्त विधान|VIDEO

Opposition Slams Maanikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सतत त्यांच्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असता आशातच त्यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान करून टीकेला आमंत्रण दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर: संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळीच्या नुकसानामुळे जगाचा पोशिंदा हा संकटात सापडला आहे. या नुकसानाची भरपाई सरकारने द्यावे अशी मागणी शेतकाऱ्यांकडून होत असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांचे प्रति वादग्रस्त विधान करून त्यांच्या भावना दुखवत आहे. काल देखील माणिकराव कोकाटे सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता म्हणाले आता काय या ढेकळ्यांचे पंचनामे करायचे का असे बोलून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या.

यामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी वाद निर्माण करणारे वक्तव्य करून टीकेला आमंत्रण दिल्याचे पाहायला मिळत आहे. कृषिखाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे आणि हेच मला मिळाले आहे असे वादग्रस्त विधान केले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com