सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ३ आमदारांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर केलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला दाखल झाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढाचे आमदार अभिजित पाटील हे देखील बैठकीला उपस्थित आहे. सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत भाजप विरूद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लढत होत आहे. मात्र वसंतराव देशमुखांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकरांनी नाराजी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ४ आमदार आहेत. यापैकी ३ आमदारांनी भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढाचे आमदार अभिजित पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी उपस्थिती लावली. तर करमाळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी याआधीच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी महाकविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.