Politics: विधान परिषद निवडणुकीआधी सोलापुरातील राजकारण फिरलं; ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा

Vidhan Parishad Election: सोलापुरमध्ये विधान परिषद निवडणुकीदरम्यान राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या १३ पैकी ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
Politics: विधान परिषद निवडणुकीआधी सोलापुरातील राजकारण फिरलं; ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा
CM Devendra FadnavisSaam Digital
Published On
  • विधान परिषद निवडणुकीपूर्वी सोलापुरात राजकारण फिरलं

  • तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या १३ पैकी ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा

  • अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली

  • या नगरसेवकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना समर्थन देण्याचा निर्णय केला जाहीर

भरत नागणे, पंढरपूर

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सोलापुरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सोलापुरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचे नेते अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भालकेना धोबीपछाड दिला आहे. अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली १३ पैकी ९ नगरसेवकांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली.

पंढरपूर नगरपालिकेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे १३ नगरसेवक आहेत. नगरपालिका निवडणुकीत भगीरथ भालकेंनी पालकमंत्री जयकुमार गोरे आव्हान दिले होते. आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जयकुमार गोरे यांनी भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत पालकमंत्री जय कुमार गोरे अजून किती धक्के देतात हे पाहावे लागेल.

Politics: विधान परिषद निवडणुकीआधी सोलापुरातील राजकारण फिरलं; ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा
Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; सोलापुरातील बडा नेता पक्षाला रामराम ठोकणार?

माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली ९ नगरसेवकांनी जयकुमार गोरे यांची भेट घेतली. या सर्व नगरसेवाकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख हे सुद्धा पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडीत भाजपसोबत होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी काय- काय होत ते कळेल असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Politics: विधान परिषद निवडणुकीआधी सोलापुरातील राजकारण फिरलं; ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी पुन्हा डाव टाकला; सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com