Mahayuti Government: नागपुरात होणार महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी?

Mahayuti Minister Oath Ceremony at Nagpur : शिवसेना शिंदे गटाला नगरविकास खाते देण्यात भाजपची तयारी असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. आमदारांच्या सोईसाठी मंत्र्यांचा शपथविधी १५ तारखेला नागपुरात होण्याची शक्यता आहे. १६ तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे १५ तारखेला नागपुरात शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता १५ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तसेच आमदाराच्या सोईसाठी मंत्र्यांचा शपथविधी हा नागपुरातच होणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com