Maharashtra Navnirman Sena : मनसे अॅक्शन मोडवर; ठाण्यातून उमेदवारी देणार

Assembly Election News : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे स्वबळावर उतरणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितल्यानंतर आता उमेवर निश्चित करण्यासाठी संभाव्य शक्यता तपासून बघितल्या जात आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाण्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाण्यातून चारही मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली असून अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आता ठाण्यातील चारही मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. कोपरी, पाच पाखाडी, ठाणे शहर, ओवळा माजीवाडा, कळवा मुंबरा याठिकाणी मनसे उमेदवार देण्याची शक्यता आहे. ठाण्यात मनसेचं वर्चस्व कायम आहे. गेल्या काही दिवसात मनसेने ठाण्यात मोठ्याप्रमाणात काम केलं आहे. त्यामुळे ठाण्यातून सकारात्मक प्रतिसाद बघता इथून सर्व जागांवर मनसे उमेदवार देणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे त्यांच्या विरोधात देखील राज ठाकरे उमेदवार देणार आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे चांगले मित्र मांडले जातात. असं असतानाही आता त्यांच्या विरोधात ठाकरे उमेदवार देणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com