Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Maharashtra Rain Alert: २१ जुलैनंतर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra IMD Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २१ जुलैनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणत्या भागांना पावसाचा सर्वाधिक फटका बसणार? हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे? जाणून घ्या

पुढील ४ ते ५ दिवसांचा अंदाज

पुणे आणि नाशिकचा घाटमाथा, रायगड, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल. सातारा (घाटमाथा), सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. हा अलर्ट मुसळधार पावसासाठी नसून वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसासाठी आहे.

राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही. केवळ काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाची मोठी तूट जाणवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com