राज्यसभेतील लोकसभेच्या सात जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार होती. सात जागांसाठी सातच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. निवडणूक आयोगाने सोमवारी अधिकृतरित्या सात जणांची निवड केली. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राला 5 नवीन खासदार मिळाले आहेत. त्यामध्ये भाजपनेते विनोद तावडे,माया इवनाते, रामराव वडकुते, पार्थ पवार, शरद पवार आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या राज्यसभेवर गेल्या आहेत. 2 एप्रिल रोजी रिक्त होत असलेल्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी सात जणांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.