Political News: भाजपच्या आमदारानेच ५०० कोटींची ऑडिओ क्लिप फोडली, ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Manoj Jarange patil Viral Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपच्या विधान परिषदेच्या आमदारानेच ही क्लिप फोडली,” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी भाजप आणि शिंदेसेनेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com