VIDEO : देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न, महायुतीची धुरा शिंदेंच्या हातात जाणार; बड्या नेत्याचा दावा

Maharashtra Politics News : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती आगामी विधानसभा निवडणूक लढवणार होती. मात्र, आता दिल्लीतील नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार सुरू आहे, असा खळबळजनक दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती आगामी विधानसभा निवडणूक लढवणार होती. मात्र, आता दिल्लीतील नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार सुरू आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हातात महायुतीची धुरा जाईल, असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.

खासदार अमोल कोल्हे यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारने जनतेत उगाच संभ्रम पसरवू नये. आरक्षणाबाबत महाविकास आघाडीची स्पष्ट भूमिका असून यावर काहीतरी सक्षम तोडगा काढावा, असं कोल्हे म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री यांचा व्हिडीओ समोर आला होता. आपण काय बोलायचे आणि निघून जायचे यामध्ये त्यांची काय भूमिका आहे, हे समजणे गरजचे असून सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे असल्याचं खासदार कोल्हे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची विधानसभा निवडणूक लढविली जाणार होती. मात्र, आता दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे महायुतीची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हातात जाईल, असं म्हणत कोल्हेंनी फडणवीसांना डिवचलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com