Maharashtra Politics: जयंत पाटील - गोपीचंद पडळकर एकाच मंचावर, दोघांची एन्ट्री होताच नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Gopichand Padalkar And Jayant Patil: सांगलीमध्ये दोन कट्टर राजकीय विरोधक जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर एकाच मंचावर आले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सांगलीत एका कार्यक्रमात कट्टर राजकीय विरोधक जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर आले. दोघांची व्यासपीठावर एन्ट्री होताच समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार हर्षदा देशुखही उपस्थित होते. गोधळानंतर जयंत पाटील यांनी आपल्या समर्थकांना शांतेतचं आवाहन करत आपल्या दारात कोणी आलं तर त्याचा सन्मान करायचा असतो असा टोला लगावला.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावचीमध्ये आमदार जयंत पाटील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर आले. जयंत पाटील व्यासपीठावर असताना गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एन्ट्री होताच गोंधळ उडाला. जयंत पाटील समर्थक आणि गोपीचंद पडळकर- सदाभाऊ खोत समर्थकांकडून एकमेकांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमांमध्ये गोपीचंद पडळकरांची उपस्थिती होती. 'आपण सुसंस्कृतपणानं वागायचं असतं, आपल्या दारात कोणी आलं तर त्याचा सन्मान करायचा असतो.', जयंत पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर गोपीचंद पडळकर यांचा आयोजकांना सत्कार करायला लावत, दोन्ही बाजूने सुरू असलेली घोषणाबाजी थांबवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.