राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात|VIDEO

Maharashtra Electricity Tariff Cut April 2026 Details: १ एप्रिलपासून वीज दरात कपात होणार असून महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवरच्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरातील वीज दरांमध्ये कपात करण्यात आली असून, हे नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज वितरण कंपन्यांनी घरगुती वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या वीज बिलात काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अल्प वापर करणाऱ्या ग्राहकांना याचा अधिक फायदा होणार आहे. दर कपातीमुळे महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातच सकारात्मक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com