मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत १०,००० कोटींचा महाघोटाळा, महाराष्ट्रात खळबळ|VIDEO

₹10,000 Crore Solar Agriculture Scheme Scam In Maharashtra: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १०,००० कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप. अंबादास दानवे यांनी बनावट बँक गॅरंटी प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले.

​मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १०,००० कोटींचा 'महा-घोटाळा' झाला आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क 'बनावट बँक गॅरंटी' देऊन कंत्राटं लाटली? असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, ​महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक (दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू इ.) यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे ५ गुन्हे दाखल होणे ही नामुष्की आहे. अधिकाऱ्यांचे थेट नाव घेत दानवे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार? अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणाऱ्या 'पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशी करणार का? असे सवाल उपस्थित करत दानवे यांनी राज्यात खळबळ उडवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com