VIDEO: विशाळगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने गडाच्या पायथ्याशी महाआरती

Vishalgad Fort News: हिंदू समाजाच्या वतीने विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेले अतिक्रमण त्वरित काढावं आणि विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा अशी शिवभक्तांची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेले अतिक्रमण त्वरित काढावं अशी शिवभक्तांची अनेक वर्षापासून मागणी आहे. याच मागणीसाठी शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याशी पोहचले आहेत. याचसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली. याठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त आणि हिंदू बांधव एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशाळगड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी जलद गतीने व्हावी अशी मागणी देखील हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com