जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

Latur Zilla Parishad President Usha Patil Official Residence Theft: लातूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी अंदाजे १२ लाख रुपये रोकड आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.

लातूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील या मतदारसंघातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर गेल्या असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करून अंदाजे १२ लाख रुपये रोकड आणि चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला आहे. चोरी नेमकी कोणत्या वेळी आणि कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार चोरी गेलेल्या रोकड आणि दागिन्यांचा तपशीलही तपासला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com