कुणाल कामराचा आता थेट RSS शी पंगा, त्या 'टी'शर्टमुळे भाजपचा संताप, नेमके प्रकरण काय? VIDEO

Kunal Kamra RSS T-shirt Controversy: कॉमेडीयन कुणाल कामराने आक्षेपार्ह ‘RSS’ टी-शर्ट घातल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी कठोर कारवाईची मागणी केली असून सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्माक टीका केल्यानंतर चांगलाचा चर्चेत असणारा कॉमेडीयन कुणाल कामरा याने आता थेट आरएसएस (RSS) वर जहरी टीका केली आहे. कामराने आक्षेपार्ह टी-शर्ट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याचे ट्विट समोर आले आहे.

त्याने शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही. तर कामराने शेअर केलेल्या त्याच्या टी शर्टवर एक कुत्रा आणि RSS चा उल्लेख केला आहे. यावर भाजपने कठोर आक्षेप घेतला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील असा इशारा दिला आहे. तर याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर ही टीका केल्याचे सांगत आता त्याने थेट संघावर टीका करण्याची हिंमत केल्याबद्दल भाजपने याला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com