केरळच्या मुख्यमंत्रिपदी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी? राज्यात खलबत|VIDEO

Ramesh Chennithala Chances For Kerala CM Post: केरळमध्ये काँग्रेसच्या विजयांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी चुरस वाढली आहे. रमेश चेन्निथला यांच्यासह अनेक नेते चर्चेत असून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडी सत्तेत आल्यानंतर पक्षात उत्साहाचे वतावरण आहे. आता सरकारस्थापनेबाबत घडामोडींना वेग आला असून नेत्यांच्या बैठका अनौपचारिक चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षातील अनेक नेत्यांचे मुख्यमंत्रिपदासाठी नाव चर्चेत असून यामध्ये ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांचे नाव आघाडीवर आहे.रमेश चेन्निथला हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी देखील आहेत. काँग्रेसने स्वबळावर 63 जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com