तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

Kandivali Railway Station Incident: कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून महिला प्रवासी आणि महिला टीसीमध्ये वाद झालाय. घटनेनंतर स्थानकात गर्दी जमली असून लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
Woman passenger and female ticket checker dispute at Kandivali station
Woman passenger and female ticket checker dispute at Kandivali station
Published On: 

कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून महिला तिकीट टीसी आणि महिला प्रवाशामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादानंतर स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला टीसीने प्रवासी महिलेकडे तिकीटाची मागणी केली. त्यानंतर संबंधित महिलेने तेथून पळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. यावेळी महिला टीसीने तिचा पाठलाग केला. या पाठलागादरम्यान प्रवासी महिला पडली असून, तिचे कपडे फाटल्याची माहिती समोर आली आहे.

Woman passenger and female ticket checker dispute at Kandivali station
Mumbai : तारीख पे तारीख...११२ वर्षांचा इतिहास असलेल्या सायन रेल्वे पूल पुनर्बांधणीनंतर वाहतुकीस खुला कधी होणार?

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी माहिती दिली की, सदर प्रवाशी महिला ही विना तिकीट प्रवास करत होती. त्यावेळी महिला टीसीनं त्यांच्याकडे तिकीटची विचारणा केली. परंतु आता दंड भरावे लागेल, या भीतीने महिला प्रवाशी पळून लागली. त्यावेळी टीसीनं दंड वसूल करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला.त्यावेळी त्या खाली पडल्या. दरम्यान विनातिकीट कोणी प्रवास करू नये, असा सल्लाही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Woman passenger and female ticket checker dispute at Kandivali station
Vande Bharat Sleeper : स्लीपर वंदे भारत मुंबईतून 'याच' महिन्यात धावणार, ८ तास वाचणार; जाणून घ्या वेळ आणि तिकीट दर

या घटनेनंतर स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी जमा झाले. त्यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. महिला टीसीने माफी मागावी, अशी मागणी काही प्रवाशांकडून करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रवाशांची गर्दी वाढल्याने कांदिवली रेल्वे स्थानकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून प्रयत्न करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com