कल्याण RTOची दमदार कामगिरी, ४०० कोटींहून अधिक महसूल जमा

kalyan rto update : कल्याण RTOने दमदार कामगिरी केली आहे. विभागाने ४०० कोटींहून अधिक महसूल जमा केलाय.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय RTO कल्याणने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ४३७.८० कोटींचा विक्रमी महसूल जमा करत उल्लेखनीय कामगिरी केलीये. थकीत पर्यावरण कर आणि वाहन कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडलीये.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक महसूल वसुली करण्यात कार्यालयाला यश आले आहे. या यशामुळे कल्याण आरटीओचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या महसुलामध्ये सर्वाधिक वाटा वाहन नोंदणी शुल्काचा आहे. वर्षभरात एकूण १,०८,१२५ वाहनांची नोंदणी करण्यात आली.

दुचाकी – ७९,५५७

चारचाकी – १६,८२६

ऑटोरिक्षा – ३,५७१

मालवाहू वाहने – ४,२९२

मागील वर्षीच्या ३७२.२२ कोटींच्या महसुलाच्या तुलनेत यंदा मोठी वाढ नोंदवली गेली. आता ही वाढ सुमारे ६५ कोटींपेक्षा अधिक आहे. ही कामगिरी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगण्यात येतय. सातत्यपूर्ण मोहीम, काटेकोर अंमलबजावणी आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद यामुळे कल्याण आरटीओने महसुलात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com