अभिजीत देशमुख, साम टीव्ही
कल्याण डोंबिवलीचा आजूबाजुच्या परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या पावसाने कल्याण डोंबिवलीच्या नालेसफाईची मात्र चांगलीच पोलखोल केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ता हा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला. रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांचे मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती काही वाहन देखील या पाण्यामुळे बंद पडली होती. दरवर्षी याच परिसरात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते मात्र केडीएमसी कडून काहीच उपाययोजना होत नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.