शिवजयंतीत तणाव! शिवप्रेमी-पोलिसांमध्ये बाचाबाची; नेमकं काय घडलं? VIDEO

Assistant Police Inspector Argument With Shiv Supporters: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची झाली.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये महाराणा प्रताप चौक येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि काही शिवप्रेमी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवजयंतीनिमित्त चौकात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या परिसरात शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com