इराण–इस्रायल युद्ध भीषण टप्प्यात; 500 मीटर जमिनीखालून ‘मिसाईल सिटीज’मधून थेट हल्ले|VIDEO

Iran Underground Missile Cities 500 Meters Deep: इराण-इस्रायल युद्ध भीषण वळणावर. 500 मीटर खोल भूमिगत ‘मिसाईल सिटीज’मधून इराणकडून थेट क्षेपणास्त्र डागण्यात येत आहेत.

इराण-इस्रायल युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचलंय. इराणनं आपल्या जमिनीखालील 500 मीटर खोल 'मिसाईल सिटीज'मधून थेट क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केलीय. या भूमिगत तळांमुळे उपग्रहांना किंवा रडारला हल्ल्याची पूर्वसूचना मिळणं अशक्य झालंय. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू असतानाही, डोंगरांच्या आतील या गुप्त शहरांमधून 'खोर्रामशहर' सारखी विनाशकारी क्षेपणास्त्रे डागली जात असल्यानं संपूर्ण जग हादरलंय.

तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी अमेरिकेच्या हल्ल्याला कडक प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की अमेरिकेने जी काही घृणास्पद आणि क्रूर चूक केली आहे. त्याचा भविष्यात अमेरिकेला खोलवर पश्चाताप होईल. यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com