Hypersonic Engine: भारताचा हायपरसॉनिक धमाका; पाकिस्तानचे धाबे दणाणले|VIDEO

Pahalgam Attack: भारताने संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठी झेप घेतली असून, DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने हायपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे.

भारताने संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठी झेप घेतली असून, DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने हायपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी DRDO च्या हैदराबादमधील प्रगत केंद्रात पार पडली असून, तब्बल 1000 सेकंदांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.

या चाचणीमुळे भारताचे हायपरसॉनिक शस्त्र प्रणालीतील स्थान अधिक बळकट झाले असून, स्क्रॅमजेट इंजिन आता पूर्ण प्रमाणात उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. या यशामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेला नवे बळ मिळाले आहे.

याआधी जानेवारी 2025 मध्ये या इंजिनची 120 सेकंदांची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्या पुढील टप्प्यात आता 1000 सेकंदांची ही मोठी यशस्वी चाचणी म्हणजे भारताच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला होता. यानंतर दिल्लीत हायकमांड बैठकींचे सत्र सुरू झाले असून सर्व यंत्रणा या सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com