India Pakistan Tension: लष्कराचा करारा बदला; POKमधील पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त, व्हिडिओ जारी

Operation Sindoor: जम्मू काश्मीरवर हल्ला केल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे त्यात भारताने पाकचे 3 लढाऊ विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तान आर्मीच्या प्रवक्त्याने दिले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिति सुरू झाली. या युद्धात भारताने केलेल्या कारवाईचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पाकिस्तानची एक चौकी जमीनदोस्त केल्याची दिसत आहे.

याबाबची अधिकृत माहिती इंडियन आर्मीने ट्विट करत दिली आहे. लष्कराने एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे. पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी ८ आणि ९ मे २०२५ च्या मध्यरात्री पश्चिम सीमेवर अनेक ठिकाणी ड्रोन व इतर शस्त्रास्त्रांचा वापर करून हल्ले चढवले. याशिवाय जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरही त्यांनी वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन (सीएफव्ही) केले.

भारतीय सुरक्षा दलांनी हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावले आणि शस्त्रसंधी उल्लंघनांना चोख प्रत्युत्तर दिले.

भारतीय लष्कर देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही कपटी कारवायांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com