India Inflation: महागाईचा भडका उडाला, तुमचा EMI पुन्हा वाढणार? सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं

EMI Increase: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महागाईचा भडका उडाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यांचा ईएमआय वाढू शकतो.

तुमचेही ईएमआय सुरू आहेत का? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण आता तुमचा EMI वाढण्याची शक्यता आहे. कारण देशात महागाईचा भडका उडाला असून किरकोळ महागाई दर थेट 4.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. तब्बल 17 महिन्यांत महागाईनं रिझर्व्ह बँकेची 4 टक्क्यांची नियंत्रणरेषा ओलांडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्याचे तेलाचे दर कडाडल्याने आणि अन्नधान्याचे भाव वाढल्याने हा फटका बसला आहे. आगामी काळात व्याजदर वाढून सामान्यांचा ईएमआय महाग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com