महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Nashik Kumbh Mela Development Irregularities News: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता उघड झाली आहे. महापौर आणि उपमहापौरांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत ठेकेदारांना इशारा दिला असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा वेग वाढला असला, तरी या कामांमध्ये गंभीर अनियमितता समोर येत आहे. यामुळे महापौर आणि उपमहापौरांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची जोरदार कानउघडणी केली आहे.

शहरात हजारो कोटींच्या भूमिगत गटारी आणि रस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे. मात्र, ही कामं करताना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा बॅरिकेड्स नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, तर काही ठिकाणी रस्ते खोदताना पिण्याच्या पाईपलाईन्स फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय रस्ते खोदून झाल्यानंतर योग्य प्रकारे सपाटीकरण करणे आवश्यक असताना केवळ वरवर माती टाकून काम उरकले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत महापौर आणि उपमहापौर ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरत खडेबोल सुनावले. विकासकामांमध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, तर निष्काळजी ठेकेदारांकडून आर्थिक वसुली करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com