Helicopter Crash VIDEO : उड्डाण भरताच अवघ्या ४ मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळलं; पुण्यातील थरार पाहा

Pune Helicopter Crash VIDEO : पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज बुधवारी सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. डोंगराळ भागातून जात असलेलं एक हेलिकॉप्टर अचानक नादुरुस्त होऊन कोसळलं.

पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज बुधवारी सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. डोंगराळ भागातून जात असलेलं एक हेलिकॉप्टर अचानक नादुरुस्त होऊन कोसळलं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला.

कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग आणि अभियंता प्रीतम भारद्वाज अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर पुणे येथून मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर येत होते.

मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला. दरम्यान, धुक्क्यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथामिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर लगेच इंजिनने पेट घेतला त्यामुळे स्फोट होऊन त्याचे तुकडे झाले. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेहाची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com