Parbhani Rain: परभणीत पावसाचा हाहाकार, गोदावरी नदीला पूर; गावकऱ्यांचा तराफ्यावरून प्रवास| VIDEO

Parbhani Flood: परभणीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत आणि पूराचे पाणी गावात शिरल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

परभणी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे परभणीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपेठ महामार्गावर पूराचे पाणी आल्यामुळे महामार्ग बंद झाला आहे. दोन तालुक्यांना जोडणारा हा महामार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

परभणी जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक रस्ते हे पावसाच्या पाण्यामुळे बंद झाले आहेत. परभणीच्या पाथरी तालुका आणि सोनपेठ तालुक्याला जोडणारा महामार्ग गोदावरी नदीला पूर आल्यामुळे बंद झाला आहे. पूराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाला आहे. तर अनेक गावातही पाणी घुसले आहे. लिंबा या गावात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती देखील पाण्याखाली गेली आहे. या पूरामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तराफ्याचा वापर करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com