अखेर गोकुळचा अध्यादेश निघाला; सरकारच्या 4 संचालकांची नेमणूक|VIDEO

Gokul Milk News: गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड! राज्यपालांच्या स्वाक्षरीने सरकारचा अध्यादेश जारी. गोकुळवर सरकारचे चार संचालक नियुक्त होणार. सतेज पाटील आणि समविचारी आघाडी या निर्णयाला कसे आव्हान देणार?

गोकुळमध्ये आपली सत्ता राहावी यासाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष अगदी टोकाला गेला आहे. सत्ताधारी नेत्यांकडून सतेज पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे डाव देखील रचले जात आहे. गोकुळवर थेट सरकारचे 4 संचालक असणार असा सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता. यामुळे राजकारण चांगलेच पेटले. या प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील एन्ट्री मारली होती. तसेच येत्या 9 तारखेला सतेज पाटील यांनी या सगळ्याच्या विरोधात मोर्चा देखील काढण्याचे सांगितले होते. अशातच आज सरकारने थेट राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश काढला. आता या सगळ्याला सतेज पाटील आणि समविचारी आघाडी कसे आव्हान देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.