धबधब्यावर जाण्याचा उत्साह नडला; एका तरूणासह ८ मुली डोंगरावर अडकल्या, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Panvel Waterfall : पनवेलमधील धबधब्यावर वर्षासहलीसाठी जाणं तरूण-तरुणींच्या जीवावर बेतू शकलं असतं. पण पोलिसांनी त्यांचा जीव वाचवला. रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ बघा!

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई | साम टीव्ही

डोंगरावरील धबधब्यावर जाण्याचा उत्साह तरूण आणि तरुणींच्या जीवावर बेतू शकला असता. पनवेलजवळच्या आदई गावानजीकच्या डोंगरावर धबधब्यावर एका तरूणासह ८ मुली गेल्या होत्या. पण ते डोंगरावरच अडकून पडले. डोंगरावरून खाली उतरण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण काही केल्या त्यांना खाली उतरणं शक्य झालं नाही. अखेर पनवेल पोलिसांनी त्यांना सुखरूप खाली उतरवलं.

पनवेलमधील आदई गावाजवळ डोंगराळ भागात धबधबा आहे. या ठिकाणी ८ मुलींसह एक मुलगा असे नऊ जण गेले होते. पोलिसांची नजर चुकवून ते या ठिकाणी वर्षासहलीसाठी गेले होते. काही वेळानं ते खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना खाली उतरता येत नव्हतं. अखेर पोलीस, अग्निशमन अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या ९ जणांना सुखरूप खाली उतरवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com