VIDEO: विधानभवना बाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद, शेतकऱ्यांचं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन
दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दुधाला किमान 40 रुपये दर करावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. एकीकडे दूध दरावरून शेतकरी आक्रमक झालेले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे.हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रकार आहे असं म्हणत शेतकऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारने आगोदर राज्यातील दूध भेसळ रोखावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाचे पडसाद आता विधानभवना बाहेर देखील पाहायला मिळत आहेत. विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांकडून दूध ओतून आंदोलन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.