VIDEO: दूध दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको.. दुग्ध विकास मंत्री Radhakrishna Vikhe patil यांच्या जिल्ह्यात शेतकरी आक्रमक

Farmer Milk Protest News: दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, शिवआर्मी दुधउत्पादक शेतकरी संघटनेकडून आंदोलन.

अहमदनगर: दूध उत्पादक शेतकऱ्यांच आंदोलन सुरु आहे. दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आल आहे. शिवआर्मी दुधउत्पादक शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात आंदोलन करण्यात येत आहे. उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक बोलावली आहे. मात्र आज त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा यासह अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com