हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी रस्त्यावर असलेल्या लासिना फाटा येथील एमटी वर्मा पेट्रोल पंपावर डिझेलवरून मोठा वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. डिझेलचा साठा उपलब्ध असतानाही पेट्रोल पंप चालकाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका शेतकऱ्याला चक्क चालकाच्या पाया पडण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील अनेक शेतकरी शेतीच्या कामासाठी डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. मात्र, पंपावर गर्दी वाढल्यामुळे आणि काही शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याच्या कारणावरून पेट्रोल पंप चालकाने डिझेल देण्यास नकार दिला. सर्वांनी शिस्तीत रांगेत उभे राहा, त्यानंतरच डिझेल दिले जाईल, अशी भूमिका चालकाने घेतली. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला. दरम्यान, डिझेल अत्यावश्यक असल्याने एका शेतकऱ्याने विनवणी करत चालकाच्या पाया पडून डिझेल देण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.