Eknath Khadse on Devendra Fadnavis: जळगावात फडणवीसांच्या कार्यक्रमात एकनाथ खडसेंची एन्ट्री;राजकीय चर्चांना उधाण |VIDEO

Eknath Khadse Entry At Devendra Fadnavis Jalgaon Event: जळगावात झालेल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे अचानक उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कार्यक्रमात होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या अनावरणाप्रसंगी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. क्रांतिवीर खाज्याजी नाईक स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे दाखल झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होती, हे खरे नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. औपचारिकरित्या जर भेट झाली तर भेट घेईल असा माझा प्रयत्न होता. हा कार्यक्रम शासकीय नव्हता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात राजकीय चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मी कार्यक्रमाला उपस्थित होतो व या कार्यक्रमाला मला आग्रहपूर्वक बोलावण्यात आले होते असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com