E20 वरून राजकारण तापलं, नितीन गडकरींच्या घरावर मोर्चा|VIDEO

E20 Fuel Protest Nitin Gadkari Nagpur Youth Congress: E20 इंधनाच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.

नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा काढला आहे. महाल येथील काँग्रेस कार्यालय देवडिया भवन ते चिटणीस पार्क चौकातून हा मोर्चा थेट गडकरींच्या घराबाहेर जमा झाला. आंदोलनासाठी युवक काँग्रेसने प्रचार पोस्टर प्रसिद्ध केले पोस्टरमध्ये, "धर्मेंद्र प्रधान तो झांकी है... नितीनजी अभी बाकी है!" असा उल्लेख करण्यात आला आहे. चिटणीस पार्क चौकात मोठा पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेटची व्यवस्था करण्यात आली असून आंदोलकांची धरपकड सुरू आहे. आंदोलकांना अडवल्याने पोलीस आणि काँग्रेस पदाधिकारी यांच्यात संघर्ष जोरदार संघर्ष सुरू पाहायला मिळाला. E20 च्या मुद्द्यावरून काँग्रेसने हा मोर्चा काढला असून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्याने वाहन खराब होत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानाबाहेर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com