डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

Dombivli Crime News : क्रिकेट खेळण्यास मनाई केली म्हणून अल्पवयीन मुलाने सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला केला. डोंबिवलीच्या टाटा नाका येथील मॉलच्या परिसरात ही घटना घडली.

मॉलच्या जागेत क्रिकेट खेळू नको, असं म्हणत मज्जाव केल्यानं अल्पवयीन मुलानं रागाच्या भरात सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला केला. यात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. डोंबिवलीच्या टाटा नाका येथील मॉल परिसरात ही घटना घडली.

डोंबिवली पूर्वेतील टाटा नाका येथील मॉल परिसरात मोकळी जागा आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुले क्रिकेट खेळतात. तेथील सुरक्षारक्षकाने एका अल्पवयीन मुलाला मॉलच्या जागेत क्रिकेट खेळण्यास जाऊ नको, असे सांगितले. या कारणामुळे अल्पवयीन मुलाने ७५ वर्षीय तुकाराम सुपुगडे या सुरक्षारक्षकावर दगडाने हल्ला केला. यात वयोवृद्ध सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com