संजय सूर्यवंशी, नांदेड | साम टीव्ही
नांदेड जिल्ह्यात डिझेलची मागणी अचानक 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत असून काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, डिझेल विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
तसेच आजपासून सर्व पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडियावर डिझेल टंचाईबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या इंधन टंचाई नाही. मागणीनुसार जिल्ह्यात इंधनपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.