Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

Parbhani Diesel Crisis Video: परभणीमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्याचसोबत शेतकरी हातात कॅन घेऊन डिझेलसाठी रांगेत उभे राहिले आहेत.

परभणी जिल्ह्यात डिझेल टंचाईचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा स्टॉक संपल्याने काही पंप बंद आहेत. तर ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या पंपांवर मोठी गर्दी होत आहे. परभणीच्या बोरी येथील एचपी पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी तसेच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शेतीच्या कामासाठी अत्यावश्यक असलेले डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तासंतास प्रतीक्षा करावी लागत असून पेट्रोल पंपाबाहेर रांग पोहोचल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कसरत करावी लागत आहे. डिझेल भरण्यासाठी कडाक्याच्या उन्हामध्ये उभं राहून शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे चित्र जिल्ह्यात सगळीकडे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com