BJP News Today: अपेक्षित यश भाजपला मिळालं नाही! Devendra Fadnavis यांनी पराभव स्वीकारला

देवेंद्र फडणवीस यांचं पत्रकार परिषदेतून सूचक वक्तव्य, उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत असल्याच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत आहेत, असे संकेतच त्यांनी स्वतः दिले आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या कमी झालेल्या जागांची जबाबदारी स्वीकारत मोठं वक्तव्य केलं. दरम्यान, त्याआधी त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील, असा विश्वासही व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी राज्यातील महायुतीच्या कामगिरीवही महत्त्वाचं मत नोंदवलं. नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com