देहू नगरी फुलांनी सजली! संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी|VIDEO

Sant Tukaram Maharaj 341st Palkhi ceremony Dehu: देहू नगरीत संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मंदिर परिसरात हजारो फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी हे विशेष आकर्षण ठरत आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाल्याचा पाहायला मिळत आहे. यावर्षी तुकोबांचा 341 वा पालखी प्रस्थान सोहळा देहू नगरीमध्ये साजरा होत आहे आणि त्यासाठीच देहूच्या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. देहूचा मंदिर परिसर, सभामंडप या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. हजारो देशी-विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मध्ये आल्यानंतर संत तुकोबांचा फुलांमध्ये रेखाटलेले चित्र पाहायला मिळत आहे आणि वारकऱ्यांचं हेच आकर्षण या ठिकाणी असल्याचा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com