Pune : सारसबागजवळ बंद कारमध्ये आढळला कुजलेला मृतदेह, २५ वर्षाच्या तरूणासोबत नेमकं काय झालं?

Pune Sarasbaug dead body : पुण्यातील सारसबागेसमोरील नेहरू स्टेडियम परिसरात दोन ते तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमध्ये शुभम बनसोडे (२५) या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला. कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Decomposed Body Found Inside Car Near Sarasbaug in Pune : सारसबाग परिसरामध्ये नेहरू स्टेडियम समोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये एका अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह आढळून आलाय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासन ही कार एकाच ठिकाणी उभी होती. कार मधन दुर्गंध येऊ लागल्यामुळे हा प्रकार उघडकीला आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे दरम्यान मृत्यूच गुढ हे अद्याप सुद्धा कायम आहे पुण्यामधल्या सारसबागे समोरच ही घटना आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असलेल्या कारमधून शुक्रवारी सकाळी दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आली.मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घातपात आहे की अन्य काही कारण, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.