कुणाल कामरा वर्षभरानंतर मुंबईत, थेट विधीमंडळात गेला, नेमकं प्रकरण काय?

Comedian Kunal Kamra: आज कॉमेडियन कुणाल कामरा विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहिला. परंतु विधीमंडळात सुनावणी आज झाली नाही. नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेऊ.

कॉमेडियन कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्याप्रकरणी ते आज हक्कभंग समितीपुढे जबाब नोंदवण्यासाठी आले होते. पण मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर नसल्याने आता ही सुनावणी १० मार्चला होणार आहे.

हक्कभंगाचा प्रस्ताव का आणला होता?

कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि विडंबनात्मक गाणे गायले होते. तर सुषमा अंधारे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यासाठी ते दोघेही विधीमंडळात हजर झाले होते. विधीमंडळात हक्कभंग समितीची बैठक झाली. या बैठकीत हक्कभंग प्रकरणी सुनावणी होणार होती.

यासाठी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हे विधीमंडळात हजर झाले होते. परंतु मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर नसल्याने ही सुनावणी झाली नाही. यामुळे ही सुनावणी १० मार्चला होणार आहे. यानंतर कुणाल कामरा यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी संविधानाला मानतो. आज हक्कभंग समितीसमोर आलो होतो, पण आज सुनावणी झाली नाही. पुढच्या सुनावणीलाही येईन. माझ्यावर जो आरोप ठेवण्यात आलाय त्यावर मी त्यावेळी उत्तर देईन, असं कामरा यावेळी म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com