CJP आंदोलन दिल्लीत पेटलं अन् मुंबईतही भडका उडाला; चैत्यभूमीवरुन आंदोलक घेतले ताब्यात|VIDEO

CJP Protest In Delhi And Mumbai Over NEET Issue: दिल्लीतील CJP आंदोलनाचा भडका आता मुंबईतही पाहायला मिळाला. NEET परीक्षेच्या मुद्द्यावर आंदोलकांनी जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही शहरांमध्ये अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

देशभरात NEET पेपरफुटीवरुन वातावरण चांगलेच तापले असून दिल्लीच्या जंतर मंतरवर CJP चे जोरदार आंदोलन सुरू आहे. आज लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने हा तरुणाईचा मोर्चा लोकसभेवर निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले आहे. मात्र जो पर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्धार कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे.

एकीकडे या दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू असताना आता याचे पडसाद देशाच्या आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई मध्ये देखील पाहायला मिळाले. दादरच्या चैत्यभूमीमध्ये देखील तरूणांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला असून पोलीस आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या तरुणांना पोलीस व्हॅनमध्ये टाकले. आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com