Jalgaon Chicken Birthday: अरररर.. खतरनाक…! भलताच थाट से कोंबडोबा ना; चिमण्याच्या वाढदिवसाची पार्टी पाहिली का?
भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
आतापर्यंत तुम्ही नेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील. अभिनेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील. पण आज तुम्ही जो वाढदिवस पाहणार आहात. तो तर जंगी आहेच मात्र अगळावेगळाही आहे.. कारण हा कोंबड्याचा बड्डे आहे. चला पाहुयात
खुर्चीवर बसलाय राजा अन् वाजतोय बाजा
डौलदार तुरा अन् बाकदार मान. आमच्या कोको शेटची हिच शान. हे आहेत कोंबडोबा नाव यांचे चिमण्या थाटात टेबलावर उभा. सभेत भाषण ठोकणाऱ्या पुढाऱ्यावाणी. गळ्यात हारबी हाय. अरं वा. पट्ट्याची ओवाळणी बी हुतीय..आता तुम्ही म्हणाल ही कशा पाय. आहो साहेबांचा बड्डे हाय. तयारीबी जोरात झालीय... घरातली मंडळी जमली. ओवाळणी झाली. चिमण्यानं केकवर ताव हाणला.. घरातल्या मंडळींनी हॅप्पी बड्डेचं गाणं म्हणलं. दुनियानं नव्या वर्षात चिकन मटणचा फक्कड बेत केलाय...पण चिमण्यानं नशिब काढलंय. गड्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुम जिओ हजारो साल और साल के दिन हो पचास हजार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

