VIDEO: UNESCO च्या जागतिक वारसा यादीत Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या गडांचा समावेश - Sudhir Mungantiwar

Chhatrapati Shivaji Maharaj Fort News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत गडांचा समावेश.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांबाबत मोठं विधान केलं आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील १२ गडकिल्ल्यांचा समावेश होणार असल्याचं मोठं विधान मुनगंटीवार यांनी केलं आहे. युनेस्कोचे प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात गडकिल्ल्यांची पाहणी करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर महाष्ट्रातील अनेक शिवभक्त आणि नागरिक भेट देत असतात, गडांचं महत्त्व हे जागतिक असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जागतिक स्तरावर पोहचणार असल्याचं यावेळी ते म्हणाले. यातून देशासह परदेशातील पर्यटक येण्यासाठी मदत होणार असा मुनगंटीवार यांचा दावा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com